#Article370 आज खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य मिळाल्याचा आनंद : महापौर वाकळे


वेब टीम : अहमदनगर
काश्मीरमधील कलम ३७० हटविण्यात आल्यानंतर नगर शहरातही भाजप नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी महापालिकेसमोर जल्लोष केला.

असा ऐतिहासिक निर्णय केवळ भारतीय जनता पार्टीच घेऊ शकते. पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या या निर्णयामुळे आज खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य मिळाल्याच्या आनंद साजरा केला जात आहे.

देशभरात जल्लोष होत असतानाच आम्ही नगरमध्येही जल्लोष केला असून, केंद्राच्या या निर्णयाचे नगरवासियांच्यावतीने स्वागत केले असल्याचे महापौर बाबासाहेब वाकळे यांनी सांगितले.

यावेळी उपमहापौर मालन ढोणे, नगरसेवक रवींद्र बारस्कर, अजय चितळे, उदय कराळे, विलास ताठे, किशोर वाकळे, नितीन शेलार, संजय ढोणे, बंटी ढापसे, पुष्कर कुलकर्णी आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post