रिकाम्या पोटी खा केळी; 'हे' आजार होतील छूमंतर


वेब टीम : मुंबई
सकाळी रिकाम्या पोटी केळी खाणे खूप फायदेशीर आहे, यामुळे शरीर स्वस्थ राहते . केळ हे शक्तिवर्धक फळ असल्याने केळ्याच्या नियमित सेवनाने शरीरातील थकवा कमी होऊन शरीराला नवीन ऊर्जा प्राप्त होण्यास मदत होते. तसेच अनेक प्रकारचे शारीरिक आजार दूर होतात. जाणून घ्या सकाळी रिकाम्या पोटी केळी खाल्ल्यास शरीराला होणारे फायदे

चेहऱ्यावरील डाग

ज्यांच्या चेहर्‍यावर डाग आहेत त्यांनी सकाळी रिकाम्या पोटी केळी खावी. त्यामुळे चेहर्‍यावर डाग , मुरूम गायब होतील आणि चेहरा चमकू लागेल.

शारीरिक दुर्बलता
ज्या लोकांना वजन वाढवायचे आहे त्यांनी सकाळी रिकाम्या पोटी केळीचे सेवन केले पाहिजे, ज्यामुळे त्यांचे शरीर निरोगी आणि मजबूत राहील. केळीमुळे शारीरिक दुर्बलता कमी होईल आणि वजन वाढेल.

पोटाच्या समस्या
सकाळी रिकाम्या पोटी केळी खाल्ल्याने पचनतंत्र सुरळीत राहते. त्यामुळे पोटा संबंधित तक्रारी उद्धभवत नाहीत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post