संसदेत हत्याराने प्रवेश करणारा तरुण ताब्यात


वेब टीम : दिल्ली
संसदेत धारदार शस्त्र घेऊन प्रवेश करण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका अज्ञात व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले.

ही व्यक्ती संसदेच्या गेट क्रमांक १ मधून आत जाण्याच्या प्रयत्नात होती. या व्यक्तीला संसद पोलीस ठाण्यात नेण्यात आले आहे.

या तरुणाचे नाव सागर इसा असल्याचे समजते. सागर इसा हा दिल्लीतील लक्ष्मी नगर मधील रहिवासी आहे.

तो नेमका कशासाठी आला होता,त्याचा उद्देश्य काय होता याबाबत काही समजलेले नाही. ताब्यात घेतलेल्या या तरुणाची संसंद पोलीस ठाण्यात चौकशी सुरू आहे.

सध्या संसदेचे अधिवेशन सुरू नसल्याने संसदेसमोरील मार्ग वाहतुकीसाठी खुला आहे. मात्र, असे असले तरी संसदेत कुणालाही प्रवेश दिला जात नाही.

अशात अचानक एक तरुण संसदेत घुसण्याचा प्रयत्न करत असल्याने तैनात सीआरपीएफ जवानांच्या लक्षात आल्यावर त्यांनी ताबडतोब थांबविले आणि ताब्यात घेतले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post