नगर जिल्ह्यात 'या' गावांना बसला भूकंपाचा धक्का


वेब टीम: अहमदनगर
संगमनेर तालुक्यातील बोटा गावासह परिसरातील पाच गावांना सोमवारी (९ सप्टेंबर) सकाळी ८ वाजून ३६ मिनिटांनी भूकंपाचा धक्का बसला. २.८ रिस्टर स्केल तिव्रतेचा हा धक्का असल्याचे भू-वैज्ञानिकांनी सांगितले.

बोटा व परिसरात गेल्या काही वर्षांपासून भूकंपाचे सौम्य धक्के बसत आहे. त्यावेळी या गावांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. मागीलवर्षीही सप्टेंबर, ऑक्टोबर आणि डिसेंबर मध्ये भूकंपाचे धक्के बसले होते.
त्यानंतर आज पुन्हा भूकंपाचा धक्का बसल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. या भूकंपाची नोंद नाशिक येथील मेरी संस्थेच्या भूकंप मापन यंत्रात झाली असून, त्याची तीव्रता २.८ रिस्टर स्केल असल्याची माहिती वरीष्ठ भू-वैज्ञानिक चारुलता चौधरी दिली.
दरम्यान या भूकंपाची माहिती मिळाल्यानंतर तहसिलदार अमोल निकम यांनी लोकांनी घाबरुन जाऊ नये, असे आवाहन केले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post