गणेशोत्सवासाठी गावी येणाऱ्या कुटुंबियांवर काळाचा घावा


वेब टीम : अहमदनगर
गणेशोत्सवासाठी मुंबईहून कर्जुले हर्या, तालुका पारनेर येथे येत असलेल्या आंधळे कुटूंबियांच्या स्विफ्ट डिझायर गाडीला कल्याण-विशाखापट्टणम महामार्गावर जबरदस्त अपघात झाला. या अपघातात दोघे जण ठार तर सहा जणजखमी झाले.

या भीषण अपघातात यश सचिन आंधळे (वय 12) हा जागीच ठार झाला तर शुभांगी आशिष आंधळे (28) यांना उपचार करण्यासाठी नेत असताना वाटेतच त्यांचे निधन झाले. तर सचिन भिमा आंधळे, आशिष भास्कर आंधळे, शिल्पा सचिन आंधळे, आराध्या आशिष आंधळे, प्राप्ती सचिन आंधळे, अर्णव सतिश आंधळे(साडेतीन वर्षे) हे या अपघातात गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर आळेफाटा येथील खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

हाकेच्या अंतरावर घर अन् काळाचा घाला!
मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग, पुणे नाशिक महामार्ग हे मोठया वाहतूकीचे मार्ग ओलांडून केवळ सात किलोमीटर अंतरावर घर राहिलेले असताना आंधळे कुटूंबाच्या वाहनावर काळाने घाला घातला व त्यात दोघे जण मरण पावले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post