दिल्लीत महागाई गगनाला; केजरीवाल सरकार विकणार कांदे


वेब टीम : दिल्ली
देशात निर्माण झालेला कांद्याचा तुटवडा आणि कांद्याचे वाढलेले दर याच्यावर दिल्ली सरकारने तोडगा काढला आहे.

दिल्ली सरकार आता नागरिकांना स्वस्त दरात कांदे विकणार आहे.

‘दिल्ली सरकार शनिवारपासून नागरिकांना २३.९० रुपये प्रतिकिलो दराने कांदे विकणार आहे.

एका व्यक्तीला आपल्या कुटुंबासाठी जास्तीत जास्त ५ किलो कांदे मिळतील.

ही सुविधा ७० मोबाईल व्हॅन आणि ४०० रेशनिंग दुकानात उपलब्ध असेल’ अशी माहिती मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post