नेवासा मतदारसंघात भगवा फडकवणार – जिल्हाप्रमुख नांगरे


वेब टीम : अहमदनगर
नेवासा तालुक्यात २०१९ च्या होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत नेवासा मतदारसंघ शिवसेनेला घेऊन या मतदारसंघात भगवा फडकणार आसल्याचे युवा सेना जिल्हाप्रमुख निरज नागरे यांनी सांगितले. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे व युवसेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या आदेशा नुसार  रविवार दि.१ सप्टेंबर रोजी नेवासा फाटा येथे यश मंगल कार्यालयात युवा सेनेचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी युवा सेना जिल्हाप्रमुख निरज नांगरे , व संपर्क प्रमुख प्रकाश  तेलगोटे ,  शिवसेना शहर प्रमुख नितीन जगताप उप जिल्हाप्रमुख शुभम उगले हे प्रमुख मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.मेळाव्याच्या प्रारंभी युवा सेना शहरप्रमुख महेश गरुटे  यांनी प्रास्ताविक व स्वागत केले.

यावेळी बोलतांना शहरप्रमुख नितीन जगताप म्हणाले की गावा गावात शिवसेना पक्षाचे काम वाढले आहे सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी शिवसेनेने आंदोलनेकेली आहेत त्यामुळे तालुक्यात शिवसेला चांगले वातावरण आहे.

तेलगोटे म्हणाले की शिवसैनिकांना व युवा सैनिकांना ताकद देण्यात येणार आहे पक्षाची ताकद वाढली आहे त्यामुळे इनकमींग चालू आहे.निरज नांगरे म्हणाले की विधानसभा निवडणुकीची तारीख लवकरच जाहीर होणार आहे.विधानसभा निवडणुकीची रणनीती ठरवण्यासाठी तसेच युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचे विचार तालुक्यात पोहचवण्यासाठी हा मेळावा आहे.  आदित्य ठाकरे साहेबांनी जन आशिर्वाद यात्रेच्या माध्यमातून महाराष्ट्र पिंजून काढला आहे. तालुक्यातुन खासदार लोखंडेना दोन्ही  लोकसभेच्या निवडणुकीत मोठे मताधिक्य मिळाले आहे. त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत नेवासा विधासभा मतदारसंघ भगवा फडकवणार आहे त्या दृष्टीने तयारीला लागा.

विकास जरीपटके, विकास शेजुळ, दिपक चिंधे, आकाश शिंदे, शिवाजी लष्करे, विकास लष्करे, दादा शेजुळ, मयुर वाघ, सदानंद गाडेकर, अक्षय चव्हाण, अमोल वाघमारे, अमोल भागवत, विशाल गायकवाड, आकाश पाटील, देवा लष्करे, गणेश झगरे, विकास उपळकर,विशाल पिटेकर,  ज्ञानेश्वर दहातोडे,सचिन पंडुरे, नंदकिशोर कोरडे, शुभम उगले,अमोल लिपने,दत्ता निपुगे, रवि रासकर,सागर शिंदे, सचिन शिरसागर, दतु बर्डे, निलेश नळघे,यांच्या सह आदि युवा सेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post