रामाचा जन्म झाला आहे, तेथून त्याचे मंदिर हटवता येणार नाही


वेब टीम : अयोध्या
येत्या नोव्हेंबर महिन्यापासून अयोध्येत राम मंदिराच्या उभारणीला सुरुवात होणार असल्याचा दावा भाजपचे राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केला आहे.

सध्या सर्वोच्च न्यायालयात अयोध्या खटला प्रलंबित आहे, मात्र न्यायालय लवकरच मंदिर उभारण्यासाठी मान्यता देईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने सुचवलेला मध्यस्थीचा तोडगाही निष्फळ ठरला. त्यामुळे न्यायालयाच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. श्रद्धा हा प्रत्येकाचा मुलभूत अधिकार आहे.

हा हक्क कोणापासूनही हिरावून घेतला जाऊ शकत नाही. त्यामुळे रामाचा जन्म झाला आहे, तेथून त्याचे मंदिर हटवता येणार नाही, असेही स्वामी यावेळी म्हणाले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post