हद्दपार नगरसेवकाची मुजोरी; पोलिसांना केली धक्काबुक्की


वेब टीम : अहमदनगर
गणेशोत्सव व मोहरमाच्या पाश्वभूमीवर शहरबंदी असणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक समद खान वहाबखान हा पोलिसांना मुकुंदनगर परिसरात दिसून आले.

पोलिसांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला असता समदखान याने धक्काबुक्की करून दुचाकीवरून पळून गेला. सोमवार (दि.९) सायंकाळी ही घटना घडली.


याबाबत माहिती अशी की, मोहरम व गणेशोत्सवानिमित्त कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीकोनातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नगरसेवक समद खान वहाब खान याला शहरातील कोतवाली, तोफखाना, भिंगार कॅम्प, एमआयडीसी, नगर तालुका या पाच पोलीस ठाण्याच्या हद्दीतून गणेश विसर्जन मिरवणूक होईपर्यंत तडीपार केलेले आहे.

तरीही आज सायंकाळी समद खान मुकुंदनगर परिसरात यांच्या घराजवळ आढळून आला.
पोलिसांच्या प्रकार लक्षात येताच भिंगार कॅम्प पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक बेंडकुळे व इतर कर्मचाऱ्यांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांना धक्काबुक्की करून तो पसार झाला.

याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात पोलीस कर्मचारी अजय नगरे यांच्या फिर्यादीवरून नगरसेवक समद खान याच्याविरुद्ध सरकारी कामात अडथळा शासकीय आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. काही दिवसांपूर्वीच नगरसेवक सलमान खान याच्याविरुद्ध ‘एमपीडीए’ कायद्यांतर्गत कारवाई केली होती. परंतु न्यायालयाने त्याची स्सुथानबद्धतेतून सुटका केली होती.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post