मुख्यमंत्री फडणवीस, दिवाकर रावते राज्यपालांच्या भेटीला


वेब टीम : मुंबई
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता शिवसेना आणि भाजपाने सरकार स्थापनेसाठी हालचाली सुरु केल्याचं दिसत आहे.

दोन्ही पक्ष एकमेकांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहेत.

त्याचाच एक भाग म्हणून शिवसेना नेते दिवाकर रावते यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली.

रावते राज्यपालांच्या भेटीला गेल्याचे कळताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील राज्यपालांची भेट घेतली.

महायुतीतीत प्रमुख पक्षांच्या दोन्ही नेत्यांनी दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी राज्यपालांची भेट घेतल्याचं सांगितलं आहे.

मात्र या भेटींतून दोन्ही पक्षांनी एकप्रकारे सत्तास्थापनेचे संकेत दिले आहेत.

महापौर झाल्यापासून दिवाळीनिमित्त आपण प्रत्येक वर्षी राज्यपालांना भेटण्याची परंपरा आहे.

त्यानुसार आजही दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी राज्यपालांची भेट घेतल्याचं दिवाकर रावतेंनी म्हटलंआहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post