वेब टीम : अहमदनगर विधानसभा निवडणुकीत पवार कुटुंबाने मोठ्या प्रमाणावर पैसा वापरला, मात्र सामान्य मतदार त्यांचा प्रयत्न हाणून पाडतील, असा...
वेब टीम : अहमदनगर
विधानसभा निवडणुकीत पवार कुटुंबाने मोठ्या प्रमाणावर पैसा वापरला, मात्र सामान्य मतदार त्यांचा प्रयत्न हाणून पाडतील, असा विश्वास अहमदनगरचे पालकमंत्री आणि भाजप उमेदवार राम शिंदे यांनी व्यक्त केला.
माझ्याविरोधात पवार कुटुंब होतं. मात्र आजपर्यंत त्यांनी या मतदारसंघासाठी काहीही केलं नाही.
त्यांनी फक्त पैश्याचा वापर मोठ्या प्रमाणात केला.
मात्र त्यांचा प्रयत्न लोक हाणून पाडतील आणि माझा विजय निश्चित करतील, असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला.
मतदानानंतर चोंडीमधील निवासस्थानी कुटुंबासोबत राहणंच मी पसंत केलं. अनेक कार्यकर्ते मला भेटायला येत आहेत.
त्यामुळे वातावरण चांगलं आहे', असं राम शिंदे म्हणाले. प्रचारादरम्यान रोज मी केवळ दोनच तास झोपायचो.
मात्र आता आराम करण्यापेक्षा कार्यकर्त्यांशी बोलणं, गप्पा मारणं, त्यांच्या उत्साहात भर टाकण्याकडे माझा कटाक्ष आहे.
कारण कार्यकर्त्यांनी केलेल्या कष्टांपेक्षा काहीच महत्त्वाचं नाही, असं राम शिंदे म्हणाले.
COMMENTS