'इतके' अपत्य असल्यास तुम्हाला मिळणार नाही सरकारी नोकरी


वेब टीम : दिसपूर
दोन पेक्षा अधिक अपत्य असल्यास यापुढे सरकारी नोकरीला विसरावे लागणार आहे. हा निर्णय आसाममधील भाजप सरकारने घेतला.

आसाममधील वाढत्या लोकसंख्येवर आळा घालण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलले.ज्यांना दोन पेक्षा अधिक अपत्य असतील त्यांना १ जानेवारी २०२१ नंतर सरकारी नोकरीमध्ये घेतले जाणार नाही.

हा निर्णय सोमवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाला. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर आसामच्या जनसंपर्क विभागाने या निर्णयाची माहिती दिली.

छोटं कुटुंब पद्धतीनुसार १ जानेवारी २०२१ नंतर ज्या कुटुंबांमध्ये दोन पेक्षा अधिक अपत्य असतील त्यांना सरकारी नोकरीपासून वंचित राहावे लागणार असल्याचे निर्णयात म्हटले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावरून वाढत्या लोकसंख्येबाबत चिंता व्यक्त केली होती.

तसेच वाढत्या लोकसंख्येला आळा घालण्यासाठी पुढील पिढीने विचार करण्याचा सल्लाही दिला होता.

वाढती लोकसंख्या हे आपल्या देशापुढील मोठे आव्हान आहे. छोटं कुटुंब हे सुद्धा देशभक्ती असल्याचे मत पंतप्रधानांनी व्यक्त केले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post