रोहितचे हे शतक ठरलंय खास; 'या' विक्रमाशी केली बरोबरी


वेब टीम : रांची
अजिंक्य रहाणेच्या साथीने झळकावलेल्या शतकी भागीदारीच्या जोरावर रोहित शर्माने तिसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाचा डाव सावरला.

दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांचा समाचार घेत रोहित शर्माने रांची कसोटीतही शतक केले.

या मालिकेतील रोहितचे हे तिसरे शतक ठरले. विशाखापट्टणम कसोटीत दोन्ही डावांमध्ये रोहित शर्माने शतकी खेळी केली होती.

भारताचे सुरुवातीचे तीन फलंदाज झटपट माघारी परतल्यानंतर रोहितने खेळपट्टीवर पाय रोवून चौफेर फटकेबाजी केली.

पिडीटच्या गोलंदाजीवर षटकार खेचत रोहितने आपल्या कसोटी कारकिर्दीतील सहावे शतक केले.

कसोटी क्रिकेटमध्ये षटकारांच्या सहाय्याने शतक पूर्ण करणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत रोहित शर्माने गौतम गंभीरशी बरोबरी केली.

या यादीत सचिन तेंडुलकर पहिल्या स्थानावर आहे.

या शतकी खेळीसह रोहित शर्मा एका कसोटी मालिकेत ३ किंवा त्यापेक्षा जास्त शतकी खेळी करणारा दुसरा भारतीय फलंदाज ठरला आहे.

यापूर्वी माजी फलंदाज सुनिल गावसकर यांनी अशी कामगिरी केली होती.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post