'या' कारणामुळे मनसेला आघाडीत घेतले नाही : शरद पवार


वेब टीम : मुंबई
काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीत मनसेला सोबत घ्यावं, अशी भूमिका राष्ट्रवादीची होती. आमची आघाडी आहे.

 त्यामुळे आघाडीत नवीन मित्रपक्ष घ्यायचे असतील तर आम्ही चर्चा करतो. मनसेला घ्यावे यासाठी आम्ही आग्रही होतो.

मात्र आमच्या इतर मित्र पक्षांना आम्ही समजवू शकलो नाही. त्यामुळे इच्छा असतानाही आम्ही मनसेला आघाडीत घेऊ शकलो नाही, अशी खंत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली. ते एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.

राष्ट्रवादीतून बाहेर पडत भाजप शिवसेनेत गेलेल्या नेत्यांवरही शरद पवारांनी वक्तव्य केलं. काही चांगले लोकही पक्ष सोडून गेले.

संघर्ष करण्याचा प्रसंग येतो, त्यावेळी जोमाने तोंड द्यायला कमी पडले, असे लोक सोडून गेले. अनेकांनी मला पक्ष सोडण्याआधी कळवलं होतं आणि त्यांच्या अडचणी सांगितल्या होत्या.

काही जण सांगून गेले, काही न सांगताच गेले. त्यांच्यावर पक्ष सोडण्यासाठी दबाव होता. संकटाच्या काळात जे उभे राहतील, अशी लोकं तयार करायला मी पण कमी पडलो. असे स्पष्टीकरणही त्यांनी दिले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post