--> संतापजनक : तरुणीवर वाहनचालकाने गाडीतच केला अत्याचार | DNALive24 Marathi : Breaking, Latest Marathi News Live, News Updates, ताज्या मराठी बातम्या

$type=ticker$snippet=hide$cate=0

संतापजनक : तरुणीवर वाहनचालकाने गाडीतच केला अत्याचार

वेब टीम : अहमदनगर नोकरीनिमित्त नगर शहरात खासगी वाहनाने येणार्‍या 21 वर्षीय तरुणीवर खासगी वाहनचालकाने गाडीतच अत्याचार केल्याची संतापजनक ...


वेब टीम : अहमदनगर
नोकरीनिमित्त नगर शहरात खासगी वाहनाने येणार्‍या 21 वर्षीय तरुणीवर खासगी वाहनचालकाने गाडीतच अत्याचार केल्याची संतापजनक घटना नगर शहरातील स्टेशनरोडवर क्लेरा ब्रुस मैदानाच्या जवळ मंगळवारी (दि.19) रात्री 8 वाजेच्या सुमारास घडली.

याबाबतची अधिक माहिती अशी की, नगर तालुक्यातील टाकळी काझी परिसरातील एक 21 वर्षीय तरुणी नगरमध्ये नोकरीकरीता खासगी वाहनाने चार महिन्यांपासून येते.

मंगळवारी तिला रात्रीची ड्युटी असल्याने संध्याकाळी 7 वाजता राहत्या घरातून आईसोबत नगरला नोकरीवर जाण्यासाठी जामखेड-नगर रोडवर आली व जामखेडहून नगरकडे जाणार्‍या वाहनाला तिने हात करुन थांबविले व तुम्ही नगरला जात आहात का असे विचारले.

त्यावर त्याने नगरला जात असून तुम्हाला नगरला सोडतो असे म्हणाला. यावर सदर तरुणीने आईचा निरोप घेऊन गाडीत बसली. त्यावेळी गाडीमध्ये चालकाशिवाय अन्य कोणीही नव्हते.

रस्त्याने येताना वाहनचालकाने तरुणीशी बोलून तिची जुजबी माहिती घेतली व तो स्वत: एमआयडीसी नगर येथे रहात असल्याचे सांगितले. गाडीमधून ते स्टेशनरोडवरील पाटील हॉस्पिटलजवळ आले असता त्याने तिला उतरण्याकरीता गाडी क्लेरा ब्रुस मैदानाजवळ रस्त्याच्या कडेला उभी केली व अचानकपणे गाडीचे सर्व दरवाजे लावून घेतले.

काचा लावून घेतल्या व तिच्याशी अंगलट करुन जबरदस्तीने तिच्यावर अत्त्याचार केला. त्यावेळी तरुणीने आरडा-ओरडा केला परंतू गाडीच्या काचा बंद असल्याने तसेच हायवेवरच्या गाड्यांचा मोठा आवाज असल्याने तिचा आवाज कोणालाही ऐकू गेला नाही.

त्यानंतर त्याने तिचा मोबाईल नंबर घेऊन माझ्याशी संपर्क ठेवायचा, नाहीतर मी तुला सोडणार नाही अशी धमकी दिली. त्यानंतर तो निघून गेला. या घटनेबाबत सदर तरुणीने आईला सांगितले. त्यानंतर कोतवाली पोलिस ठाण्याकडे धाव घेतली.

याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी सदर तरुणीच्या फिर्यादीवरुन अनोळखी वाहनचालकाविरुद्ध भा.दं. वि. कलम 376 प्रमाणे बलात्काराच्या गुन्ह्याची नोंद केली असून पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक भंगाळे हे करीत आहेत.

COMMENTS

नाव

Agriculture,351,Ahmednagar,1008,Astrology,36,Automobiles,84,Breaking,4282,Breaking India,1,Business,22,Cricket,143,Crime,1026,Education,193,Entertainment,239,Health,687,India,1515,Lifestyle,67,Maharashtra,2656,Politics,2717,Politics Ahmednagar,1,Sport,204,Technology,163,Vidhansabha2019,356,World,670,
ltr
item
DNALive24 Marathi : Breaking, Latest Marathi News Live, News Updates, ताज्या मराठी बातम्या: संतापजनक : तरुणीवर वाहनचालकाने गाडीतच केला अत्याचार
संतापजनक : तरुणीवर वाहनचालकाने गाडीतच केला अत्याचार
https://1.bp.blogspot.com/-HDuninQmGis/XQj8_lsWU3I/AAAAAAAADes/VD6gkrkZ0VUnY32AodXop9DO3_ANwc9jgCPcBGAYYCw/s1600/rape.jpg
https://1.bp.blogspot.com/-HDuninQmGis/XQj8_lsWU3I/AAAAAAAADes/VD6gkrkZ0VUnY32AodXop9DO3_ANwc9jgCPcBGAYYCw/s72-c/rape.jpg
DNALive24 Marathi : Breaking, Latest Marathi News Live, News Updates, ताज्या मराठी बातम्या
https://mr.dnalive24.com/2019/11/Balatkar.html
https://mr.dnalive24.com/
https://mr.dnalive24.com/
https://mr.dnalive24.com/2019/11/Balatkar.html
true
875393083891808849
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content