शपथविधी दरम्यान सुरक्षेची काळजी घ्यावी : न्यायालय


वेब टीम : मुंबई
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गुरुवारी शिवतीर्थावर मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. त्यांच्या शपथविधीची जय्यत तयारी सुरु असताना मुंबई उच्च न्यायालयाने मात्र शपथविधी सोहळ्याच्या सुरक्षेवर चिंता व्यक्त केली आहे.

‘न्यायालय कार्यक्रम थांबवत नसून काही अप्रिय घटना घडू नये यासाठी सुरक्षा व्यवस्थांनी अधिक दक्षता घ्यावी’ असं न्यायालयाने म्हणलं आहे.

‘वीकम ट्रस्ट’ या स्वयंसेवी संस्थेने न्यायालयात दाखल केलेल्या एका अर्जावर सुनावणी करताना न्यायालयाने चिंता व्यक्त केली. ‘सार्वजनिक मैदानांवर अशा प्रकारच्या कार्यक्रमांचा पायंडा पडू नये.

असे झाल्यास जो तो उठेल आणि अशा प्रकारच्या कार्यक्रमांसाठी सार्वजनिक मैदानांचा वापर करेल,’ असं मत न्यायमूर्ती एस. सी. धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती आर. आय. छागला यांच्या खंडपीठाने व्यक्त केलं.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post