न्यायालयाच्या इमारतीवर चढून वकिलाचा आत्महत्येचा प्रयत्न


वेब टीम : दिल्ली
दिल्ली पोलिसांच्या 11 तासांच्या ’सत्याग्रहा’ च्या दुसर्‍याच दिवशी दिल्लीतले वकिल रस्त्यावर उतरले आहेत.

दिल्लीच्या पाच जिल्हा न्यायालयांच्या वकिलांनी काम बंद केले आहे. सामान्य माणसांना यामुळे त्रास सहन करावा लागत आहे.

वकील कोणालाही कोर्टाच्या परिसरात येण्यास मज्जाव करत आहेत. रोहिणी कोर्टात तर एक वकिलाने इमारतीच्या छतावर चढून आत्महत्येचा प्रयत्न केला आहे.

सध्या पतियाळा हाऊस कोर्ट, साकेत कोर्ट, रोहिणी कोर्ट, कडकड्डूमा कोर्ट आणि तीस हजारी कोर्टात वकिल आंदोलन करत आहेत.

रोहिणी कोर्ट परिसरात एक वकील इमारतीवर चढला. आरोपी पोलिसांविरोधात कारवाई करण्याची मागणी करत या वकिलाने आत्महत्येचा इशारा दिला.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post