वेब टीम : अहमदनगर रात्रीच्यावेळी घरासमोर रस्त्याच्या कडेला लावलेली मोटारसायकल कोणीतरी अज्ञात चोराने ज्वलनशील पदार्थ टाकून पेटवून दिली. ...
वेब टीम : अहमदनगर
रात्रीच्यावेळी घरासमोर रस्त्याच्या कडेला लावलेली मोटारसायकल कोणीतरी अज्ञात चोराने ज्वलनशील पदार्थ टाकून पेटवून दिली.
ही घटना मंगळवारी (दि.19) रात्री माळीवाडा पंचपीर चावडी येथे घडली.
अन्सार ईब्राहिम सय्यद (रा.शिवम प्लाझा टॉकीजमागे, पंचपीरचावडी, माळीवाडा) यांनी त्यांची बजाज पल्सर मोटारसायकल (एमएच 16 बीआर 3889) रात्री घराच्याबाहेर रस्त्याच्या कडेला उभी केली होती.
कोणीतरी अज्ञात चोराने मोटारसायकलवर ज्वलनशील पदार्थ टाकून पेटवून दिली.
याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी अन्सार सय्यद यांच्या फिर्यादीवरुन जळीताच्या गुन्ह्याची नोंद केली असून अधिक तपास हे.कॉ.गिरी गोसावी हे करीत आहेत.
COMMENTS