शिवसेनेने युतीतून बाहेर पडावे; तरच तोडगा : अशोक चव्हाण


वेब टीम : मुंबई
भाजपा व शिवसेना दोन्ही पक्ष आपल्या भूमिकांवर ठाम आहेत. शिवाय विविध मार्गांचा अवलंब करून एकमेकांवर दबाव देखील आणला जात आहे.

काँग्रेस, राष्ट्रवादीच्या मदतीने शिवसेना सरकार स्थापन करणार असल्याचा चर्चा सुरू आहेत. महाराष्ट्रात शिवसेनेचाच मुख्यमंत्री होईल असा दावा शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला.

सुधीर मुनगंटीवार महाराष्ट्राला लवकरच गोड बातमी मिळेल असे म्हणाले होते. महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार ही ती गोड बातमी आहे असेही राऊत यांनी सांगितले आहे.

जोपर्यंत शिवसेना युतीतून बाहेर पडत नाही, तोपर्यंत यावर तोडगा निघणार नाही, असेही अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.

 त्यांच्या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवरच काँग्रेसचा एक गट शिवसेनेला पाठिंबा देण्याच्या तयारीत असल्याचं दिसत आहे.

यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली असल्याचेही बोलले जात आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post