मैदानांवर सुविधा द्या; तरच प्रेक्षकांची संख्या वाढेल : द्रविड


वेब टीम : बेंगळुरू
दिवस-रात्र सामने हे कसोटी क्रिकेटकडे लोकांना वळविण्यासाठी कराव्या लागणाऱ्या अनेक उपायांपैकी एक आहे. दवाची फारशी समस्या आली नाही तर आपल्याकडे दरवर्षी दिवस-रात्र कसोटी सामन्याचे आयोजन होऊ शकते.

जेंव्हा चेंडू ओलसर होतो तेंव्हा गोलंदाजांसाठी काम अवघड होते पण गुलाबी चेंडूच्या आकर्षणाने लोक मैदानाकडे वळत असतील तर हा प्रयोग करायला हवा असे द्रविडने म्हटले आहे.

भारतातील पहिला वाहिला दिवस रात्र कसोटी सामना दोन दिवसांवर आला आहे. या नव्या प्रयोगामुळे कसोटी क्रिकेटकडे पुन्हा प्रेक्षक वळतील हे खरे, मात्र कसोटी सामन्यांकडे लोकांना आकर्षित करण्यासाठी दिवस रात्र कसोटी सामने हा एकच पर्याय नाही, असे दिग्गज क्रिकेटपटू राहुल द्रविडने म्हटले आहे.

मैदानांठिकाणी पुरेशी प्रसाधनगृहे, आरामदायी बैठकव्यवस्था आणि कार पार्किंगची सोय अशा सुविधा दिल्या तरी प्रेक्षकांची गर्दी वाढेल असे मत त्याने मांडले आहे. माजी कर्णधार आणि राष्ट्रीय क्रिकेट अकॅडेमीचे प्रमुख असल्याने राहुलच्या या मताला निश्चितच महत्त्व आहे.

2001 मध्ये आम्ही ईडन गार्डनवर कसोटी सामना खेळलो त्यावेळी एक लाख प्रेक्षक मैदानात होते. त्यावेळी एचडी टेलिव्हिजनसारख्या दर्जेदार सुविधा नव्हत्या, मोबाईलवर क्रिकेट आलेले नव्हते आणि मैदानात जाऊन खेळ बघण्याशिवाय दुसरा चांगला पर्याय नव्हता मात्र आता सारे चित्रच बदलले आहे आणि आपण हा बदल स्विकारला पाहिजे.

 सामन्यांना नेहमी गर्दी असते याचे कारण त्यांच्या सामन्यांच्या तारखा निश्चित असतात. जसे की ख्रिसमसच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे बॉक्सिंग डेला ऑस्ट्रेलिया त कसोटी सामना होणे निश्चित असते आणि जुलैमध्ये लॉर्डस् मैदानावर कसोटी सामना होणारच हे पक्के असते.असे आपल्याकडे झाले तर प्रेक्षकांनाही नियोजन करता येईल असेही द्रविडने म्हटले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post