मी 700 कोटी मागितले, 'त्यांनी' 1000 कोटी दिले


वेब टीम : बेंगळुरू
कर्नाटकात मोठी उलथापालथ झाल्यानंतर भाजपचे सरकार स्थापन झाले. आता अपात्र ठरलेले आमदार नारायण गौडा यांनी एक मोठा दावा केला आहे.

मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांनी कृष्णराजपेट मतदारसंघाच्या विकासासाठी एक हजार कोटी रुपये दिले, त्यांना फक्त 700 कोटी रुपये मागितले होते, असा दावा या आमदाराने केला. हे पैसे विकासकामासाठीच खर्च झाले असल्याचंही गौडा यांनी स्पष्ट केले.

गौडा म्हणाले की, मी कृष्णराजपेट मतदारसंघाच्या विकासासाठी 700 कोटी रुपये मंजूर करण्याची विनंती केली. त्यांनी (येडियुरप्पा) 300 कोटी रुपये जास्त देण्याचे आश्वासन दिले.

यानंतर त्यांनी तो निधी मंजूरही केला. अशा चांगल्या माणसाला आपण समर्थन देऊ नये का? मी याच कारणांमुळे पाठिंबा दिला.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post