वेब टीम : नाशिक भाजपा नेत्या पंकजा मुंडेंच्या ट्विटर हॅण्डलवरुन भाजप गायब असं चित्र दिसून आलं असून, त्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची...
वेब टीम : नाशिक
भाजपा नेत्या पंकजा मुंडेंच्या ट्विटर हॅण्डलवरुन भाजप गायब असं चित्र दिसून आलं असून, त्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा सध्या राज्यभरात सुरु आहे. यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
पंकजाच काय राज्यातील अनेक बडे नेते शिवसेनेच्या संपर्कात आणि वाटेवर असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
नाशिक येथे पत्रकारांशी बोलताना राऊत म्हणाले की, पंकजा मुंडेंबाबत तुम्हाला १२ डिसेंबरलाच सगळं स्पष्ट होईल. पंकजाच काय शिवसेनेच्या वाटेवर अनेक मोठी लोक आहेत.
राज्यात आता आमचं सरकार स्थापन झालं आहे, असं सांगताना महाराष्ट्राची आर्थिक स्थिती गंभीर असल्याचे ते म्हणाले.
तसेच बुलेट ट्रेनचं ओझं आमच्यावर नको अशा शब्दांत त्यांनी या प्रकल्पाला स्थगितीच्या मुख्यमंत्र्यांच्या विधानाला दुजोरा दिला.
तसेच आरेप्रमाणे नाणार प्रकल्पात आंदोलन करणाऱ्यांवरील गुन्हे मागे घेण्यासंदर्भात मुख्यमंत्री निर्णय घेतील, असंही संजय राऊत म्हणाले.
भाजपा खासदार अनंत हेगडे यांच्या दाव्यावर फडणवीस नाही तर मुख्य सचिव खुलासा करतील, असेही ते म्हणाले.
COMMENTS