नागपूर : नागरिकत्व कायद्याविरोधात गैरसमज पसरविण्यात येत आहेत : फडणवीस


वेब टीम : नागपूर
नागरिकत्व संशोधन कायदा धर्माच्या किंवा जातीच्याविरोधात नाही, अशी ग्वाही विरोधीपक्ष नेता देवेन्द्र फडणवीस यांनी संविधान चौक सभेत दिली.

नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थानात आज नागपुरात लोकाधिकार मंच आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनं भव्य मोर्चा काढण्यात आला.

काही राजकीय पक्ष आणि लोकांद्वारे या कायद्याबाबत समाजात गैरसमज पसरविण्यात येत असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला. अशा अफवा आणि गैरसमज पसरवणाऱ्यांच्या निषेधार्थ नागपूरकर रस्त्यावर उतरले असल्याचं फडणवीसांनी सांगितलं.

नागपूरच्या यशवंत स्टेडियम ते संविधान चौक असा भव्य मोर्चा काढण्यात आला. देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी देखील उपस्थित होते. फडणवीसझाशीची राणी चौक ते संविधान चौक पायी चालले.

फडणवीस यांनी राणी लक्ष्मीबाई यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केले. नागरिकत्व कायद्याच्या समर्थनार्थ ‘जागो जागो हिंदू जागो, घुसपैठियों जल्दी भागो’, ‘देश को बचना है, सीएए लाना है’, अशा घोषणा देण्यात आल्या.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post