'त्या' नराधमांनी केले होते नऊ महिलांवर अत्याचार : चौकशीत सत्य उघड


वेब टीम : हैदराबाद
‘हैदराबादमधील महिला डॉक्टरवर अतिप्रसंग करून तिला मारणाऱ्या नराधमांनी त्याआधी नऊ महिलांवर अत्याचार करून त्यांना जाळून मारले होते,’ अशी माहिती तपासात समोर आली. पोलिसांनीच या चौकशीचा तपशील उघड केला.

या संदर्भात एका खासगी वृत्तपत्राने माहिती दिली. २७ नोव्हेंबर रोजी चौघा नराधमांनी डॉक्टरवर अत्याचार करून तिला जाळून मारले होते. या प्रकरणी मोहम्मद आरिफ,जे.नवीन,जे.शिवा आणि चेनाकेशवुलू यांना अटक केली होती.

चौकशीसाठी घटनास्थळावर नेलेल्या या नराधमांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी पोलिसांशी झालेल्या चकमकीत त्यांचा मृत्यू झाला होता. मात्र, त्याआधी पोलिसांनी त्यांची कसून चौकशी केली होती. त्यात त्यांनी अत्यंत धक्कादायक माहिती दिली होती.

एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने ही माहिती दिली. ‘डॉक्टर महिलेच्या हत्येच्या प्रकरणात त्या चौघांना अटक केल्यानंतर आम्ही कर्नाटक व तेलंगण महामार्गावर झालेल्या बलात्कार व हत्येच्या १५ घटनांसदर्भात त्यांची चौकशी सुरू केली.

चौघांपैकी आरिफ आणि चेन्नाकेशवुलू यानी नऊ बलात्कार व हत्यांमध्ये सहभाग असल्याची कबुली दिली. तेलंगणातील संगारेड्डी, रंगारेड्डी व मेहबूबनगर तसेच, कर्नाटकच्या सीमावर्ती भागांत त्यांनी हे गुन्हे केले होते.


त्यांच्या अत्याचाराला बळी पडलेल्यांमध्ये वेश्या आणि तृतीयपंथीयांचाही समावेश होता. या सर्व प्रकरणांची आम्ही सखोल चौकशी करत आहोत. त्यासाठी पोलीस पथके घटनास्थळी पाठवली आहेत,’ असे ही त्या अधिकाऱ्याने सांगितले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post