निर्भयाच्या दोषींना देणार एकाच वेळेस फाशी


वेब टीम : दिल्ली
‘निर्भया’ बलात्कार प्रकरणातील चारही दोषींना एकाच वेळी फाशी देण्याची तयारी तिहार तुरुंग प्रशासनाने सुरू केली आहे.दुसरीकडे, दोषींना नेमकी कधी फाशी देण्यात येईल, याबाबत तुरुंग प्रशासनाकडून स्पष्ट केलेल नाही.

पतियाळा हाऊस न्यायालयाने शुक्रवारी दोषींच्या ‘डेथ वॉरंट’वरील सुनावणी तहकूब केली. तसेच एका दोषीचा अर्ज सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. त्यामुळे फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी तूर्तास लांबणीवर पडू शकते.

निर्भया प्रकरणातील चौघा दोषींना फाशी देण्याची तयारी तुरुंग प्रशासनाने सुरू केली आहे.तिहारमध्ये एकाच वेळी चौघांना फाशी देण्यासाठी नव्या तंत्राचे परीक्षण होत आहे.ज्या ठिकाणी फासावर लटकावले जाते, त्यात काही बदल करण्याचे काम सुरू आहे,असे समजते.

चौघांचे वजन एकाच वेळी उचलण्याची क्षमता आहे की नाही हे तपासले जात आहे. चौघांना एकाच वेळी फाशी देणे आवश्यक आहे.अंमलबजावणीवेळी एखाद्याला अस्वस्थ वाटू लागले तर, तो आजारी होऊ शकतो आणि फाशी टळू शकते, असे समजते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post