वेब टीम : अहमदनगर वाळुची चोरटी वाहतुक करणारा ढंपर पैसे घेऊन सोडून दिल्याचा आरोप असणारे तसेच गांजा प्रकरणातील अटक असलेला आरोपी फरार झाल्...
वेब टीम : अहमदनगर
वाळुची चोरटी वाहतुक करणारा ढंपर पैसे घेऊन सोडून दिल्याचा आरोप असणारे तसेच गांजा प्रकरणातील अटक असलेला आरोपी फरार झाल्याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यातील 4 पोलिसांवर प्रभारी पोलिस अधिक्षक सागर पाटील यांनी गुरूवारी (दि.16) निलंबनाची कारवाई केली आहे.
या कारवाईत प्रभाकर भांबरकर, राहुल खरात, राजेश जाधव, किरण बारवकर यांचे निलंबन करण्यात आले.
याबाबतची माहिती कोतवालीचे पोलिस निरीक्षक विकास वाघ यांच्याकडुन समजली की, अवैध वाळु वाहतूक करणारा ढंपर कोतवालीच्या प्रभाकर भांबरकर, राहुल खरात व राजेश जाधव यांनी पकडला होता. तो ढंपर पैसे घेऊन सोडून दिल्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला.
तसेच शहर पोलिस उपअधिक्षक संदीप मिटके यांच्या पथकाने बेकायदेशीर गांजा वाहतुक करणार्या दोघांना ताब्यात घेतले होते. मात्र त्यातील एक आरोपी जिल्हा रूग्णालयातुन तो पोलिस किरण बारवकर यांच्या ताब्यात असताना फरार झाला होता.
या दोन्ही प्रकरणाची गंभीर दखल घेत प्रभारी पोलिस अधिक्षक सागर पाटील यांनी दोषी असलेल्या चारही पोलिस कर्मचार्यांना निलंबनाची कारवाई केली आहे.
COMMENTS