वेब टीम : अहमदनगर अंगावर का थुंकलास? याचा जाब विचारल्याने त्याचा राग येवून चौघाजणांनी एका युवकास फायटर तसेच लाथा-बुक्क्यांनी जबर मारहाण...
वेब टीम : अहमदनगर
अंगावर का थुंकलास? याचा जाब विचारल्याने त्याचा राग येवून चौघाजणांनी एका युवकास फायटर तसेच लाथा-बुक्क्यांनी जबर मारहाण करत चाकुने जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याची घटना नगर-सोलापूर महामार्गावर वाकोडी फाटा येथे घडली.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, प्रकाश दशरथ भिंगारदिवे (वय 31, रा.फर्याबाग जवळील केदार वस्ती) हा रस्त्याने जात असताना कृष्णा साठे हा युवक त्याच्या अंगावर थुंकला.
याबाबत भिंगारदिवे याने त्यास विचारणा केली असता त्याचा राग येवून दोघात शाब्दिक चकमक झाली. यावेळी कृष्णा साठे सह त्याचे साथीदार सोंड्या नवगिरे, अरुण थोरात, राकेश (पूर्ण नाव माहित नाही) या चौघांनी भिंगारदिवे यास फायटरने तसेच दगडाने व लाथा-बुक्क्यांनी जबर मारहाण केली.
शिवीगाळ करत चाकुने जिवे ठार मारण्याची धमकीही दिली. या मारहाणीच्या वेळी भिंगारदिवे याच्या खिशातील 5 हजार रुपये गहाळ झाले आहेत.
याबाबत प्रकाश भिंगारदिवे याच्या फिर्यादीवरुन भिंगार कॅम्प पोलिसांनी चौघा आरोपींविरुद्ध भा.दं.वि.क. 323, 324, 504, 506 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
COMMENTS