वेब टीम : अहमदनगर लष्कराच्या के. के. रेंजच्या हद्दीतून आणलेला बॉम्ब निकामी करीत असताना त्याचा स्फोट होऊन एक जण जागीच ठार झाला आहे. ही घ...
वेब टीम : अहमदनगर
लष्कराच्या के. के. रेंजच्या हद्दीतून आणलेला बॉम्ब निकामी करीत असताना त्याचा स्फोट होऊन एक जण जागीच ठार झाला आहे. ही घटना नगर तालुक्यातील खारेकर्जुन येथे येथे शुक्रवारी (दि.14) सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास घडली.
या स्फोटात भिवा सहादू गायकवाड (वय 55, रा. खारे कर्जुने) हे मयत झाले आहेत. याबाबत समजलेली माहिती अशी की, के.के. रेंज हद्दीत लष्कराचा युद्ध सराव चालतो, या सरावात प्रत्यक्ष दारूगोळाही उडविण्यात येतो.
सराव संपल्यानंतर परिसरातील काही लोक येथे निकामी झालेल्या बॉम्बचे भंगार गोळा करण्यासाठी लष्करी हद्दीत जातात. निकामी झालेले बॉम्ब गोळा करण्यासाठी ठेकेदाराची नियुक्त केली आहे.
मात्र खारेकर्जुने येथील काही लोक ठेकेदारांची नजर चुकून लष्करी हद्दीमध्ये शिरून हे बॉम्बचे भंगार साहित्य गोळा करतात. आजचा प्रकारही असाच घडला. येथील काहीजण निकामी झालेले बॉम्बचे भंगार गोळा करण्यासाठी शुक्रवारी (दि.14) सकाळी गेले होते.
त्यांच्यात भिवा गायकवाड हे ही होते. तेथे त्यांना भरलेला बॉम्ब सापडला. तो त्यांनी माळरानावर फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र यावेळी या बॉम्बचा स्फोट झाल्याने त्यात गायकवाड हे जागीच ठार झाले. घटनेची माहिती मिळताच एम.आय.डी.सी. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली.
COMMENTS