उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांची भूमिका खुंटीला टांगली : प्रवीण दरेकर


वेब टीम : मुंबई
राज ठाकरे यांनी घेतलेल्या हिंदुत्ववादी भूमिकेमुळे उद्धव ठाकरे अस्वस्थ झाले आहेत, असा टोमणा भाजपाचे नेते प्रवीण दरेकर यांनी मारला. 

बाळासाहेब ठाकरे यांनी बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली होती.

उद्धव ठाकरे यांनी सत्तेसाठी तडजोड करून ती भूमिका खुंटीला टांगली, अशी टीका त्यांनी केली.

बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांविरुद्धच्या भूमिकेला शिवसैनिकांचाही मोठ्या संख्येत पाठिंबा मिळतो आहे, असा दावा दरेकर यांनी केला.

बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांना देशाबाहेर काढण्याचा विषय देशाच्या सुरक्षिततेशीही जुळलेला असल्याने देशप्रेमी नागरिक या मोर्चाला पाठिंबा देत आहेत, असे ते म्हणाले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post