इंदोरीकर महाराजांवर गुन्हा दाखल न झाल्यास त्यांना काळे फासू : तृप्ती देसाई

file photo

वेब टीम : अहमदनगर

सुप्रसिद्ध कीर्तनकार इंदोरीकर महाराजांविरोधात येत्या दोन-तीन दिवसांत गुन्हा दाखल न झाल्यास, महाराजांना काळे फासण्याचा इशारा भूमाता ब्रिगेडच्या प्रमुख तृप्ती देसाई यांनी दिला आहे.

इंदोरीकर महाराजांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा, यासाठी तृप्ती देसाई यांनी आज मंगळवारी नगर येथे पोलिस अधीक्षकांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी लेखी तक्रार दिली.

इंदोरीकर महाराजांच्या विरोधात तत्काळ गुन्हा दाखल करण्यात आला नाही तर आमच्या कार्यकर्त्या महाराजांच्या अकोले येथील आश्रमात जाऊन त्यांना काळे फासतील, असा इशारा त्यांनी आज माध्यमांशी बोलताना दिला.

गुन्हा दाखल न झाल्यास, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना त्यांच्या कार्यालयात कोंडून ठेवू, असा इशाराही यावेळी तृप्ती देसाई यांनी दिला.

दरम्यान, तृप्ती देसाई निवेदन देणार असल्याचे समजताच, इंदोरीकर महाराजांच्या समर्थकांनी देसाई यांना काळे झेंडे दाखवीत त्यांचा निषेध केला.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post