लोक ऐकत नसतील तर पोलिसी हिसका दाखवा : गृहमंत्र्यांचे आदेश


वेब टीम : मुंबई
महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी नियम न पाळणाऱ्यांना पोलिसांच्या काठीचा हिसका दाखवण्याचे आदेश दिले आहेत.

कोरोना संसर्गाच्या नियंत्रणासाठी राज्य सरकारने संचारबंदी आणि जमावबंदी लागू करुनही न ऐकणाऱ्यांवर आता थेट पोलिसी स्टाईलने कारवाई होणार आहे.

स्वतः महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी नियम न पाळणाऱ्यांना पोलिसांच्या काठीचा हिसका दाखवण्याचे आदेश दिले आहेत .

एका खाजगी दूरचित्रवाणी वाहिनीशी मुलाखतीत ते बोलत होते.

अनिल देशमुख म्हणाले, “आता आमची सीमा संपली आहे. आम्ही मागील 8 दिवसांपासून वारंवार विनंती करतो आहे.

त्यामुळे आता मी गृहमंत्री म्हणून सर्व पोलिसांना सांगतो की आपली विनंती करुन झालं आहे, आता जे कोणी 5 ते 10 टक्के शासनाच्या सूचनांप्रमाणे सहकार्य करत नाहीत, त्यांना आपल्या काठीचा हिसका दाखवा.

राज्यभरातील प्रत्येक जिल्ह्यात याची अंमलबजावणी करावी. याशिवाय ही सहकार्य न करणारी काही मंडळी रस्त्यावर येणं थांबवणार नाही.”

सरकारच्या सूचना न पाळण्यात उच्च शिक्षित लोकही आहेत. त्यांनाही याचं गांभीर्य कळत नाही याचं दुःख आहे. ज्यांचं शिक्षण नाही त्यांचं मी थोडं समजू शकतो, मात्र तरीही ते शाहण्यासारखे वागत आहेत.

मात्र, जे उच्च शिक्षित लोक आहेत त्यातील अनेक लोक सहकार्य करत नाहीत. ही दुर्दैवी गोष्ट आहे. त्यामुळे शिकलेला असो अथवा नसो त्यांच्यावर पोलिसांच्या माध्यमातून कडक कारवाई केली जाईल.

पोलिसांना जी कारवाई करायची आहे त्याची त्यांना पूर्ण परवानगी दिली आहे. त्यांना त्याबाबत स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत, असंही अनिल देशमुख यांनी नमूद केलं. नागरिकांनी सहकार्य केलं नाही, तर आपली स्थिती इटलीसारखी होईल.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post