चिन्यांचा अजब देश : कोरोना व्हायरस जात नाही तोच आता आला नवीन जीवघेणा व्हायरस


वेब टीम : बीजिंग
चीनमधून जगात पसरलेल्या ‘कोरोना’च्या साथीतून जग सावरले नसतानाच चीनमध्ये ‘हंटा’ व्हायरस (विषाणू)ने एकाचा बळी घेतला आहे.

हंटाचा बळी ठरलेला हा नागरिक बसने शाडोंग प्रांतात जात होता.

हंटाचीपण साथ पसरू शकते म्हणून त्या बसमध्ये प्रवास करणाऱ्या सर्व ३२ प्रवाशांचीही चाचणी करण्यात आली आहे.

चीनच्या ‘ग्लोबल टाइम्स’ या सरकारी वृत्तपत्राने हि बातमी प्रकाशित केल्यानंतर सोशल मीडियावर #Hantavirus ट्रेंडिंगमध्ये आहे.

कोरोना व्हायरसप्रमाणे ‘हंटा व्हायरस’ मानव जातीवरचे नवे संकट ठरू शकते या शंकेने लोक हादरले आहेत.

सोशल मीडियावर #Hantavirus या हॅशटॅगसह लोक त्यांची मते मांडत आहेत.

चीनी लोक जोपर्यंत जिवंत जनावरे खाणे बंद करत नाहीत तोपर्यंत असेच होत राहील, अशी संतप्त प्रतिक्रिया बहुसंख्य लोक व्यक्त करत आहेत.

सोशल मीडियावर हंटा व्हायरसवरजोरदार चर्चा सुरू झाली आहे.

दरम्यान, हंटा व्हायरस करोना व्हायरससारखा धोकादायक नाही. करोनाप्रमाणे पृष्ठभागावरुन पसरत नाही.

उंदीर किंवा खार या प्राण्यांपासून पसरतो, अशी प्राथमिक माहिती आहे.

रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्राच्या माहितीनुसार, उंदीर एका घरातून दुसऱ्या घरात जात-येत असतील तर या व्हायरसच्या संसर्गाचा धोका वाढतो.

निरोगी व्यक्ती हंटा व्हायरसच्या संपर्कात आली तर त्याला संसर्ग होण्याचा धोका आहे.

उंदीर किंवा उंदराचे मल-मूत्र साफ केल्यानंतर तो हात नाका – तोंडाला लागल्यास हंटाचा संसर्ग होण्याचा धोका असतो.

हंटाच्या रुग्णांना ताप, डोकेदुखी, पोटदुखी, डायरियाचा त्रास होतो. उपचाराला विलंब झाल्यास रुग्णाला श्वास घेण्यास त्रास होतो.

सीडीसीच्या मते, हंटा व्हायरस जीवघेणा आहे. या व्हायरसने ३८ टक्के रुग्णांचा मृत्यू होतो.

संपूर्ण जगात करोनाने हहा:कार माजवला असताना असतानाच चीनमध्ये हंटा व्हायरसने रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

या संदर्भात उल्लेखनीय आहे की, कोरोना व्हायरसचा जन्म चीनच्या वुहानमध्ये झाला होता.

कोरोना व्हायरसने डिसेंबरपासून जगभरात १६ हजारपेक्षा जास्त जणांचा बळी घेतला आहे.

१९५ देशांमध्ये हा व्हायरस पसरला असून साडे तीन लाखांपेक्षा जास्त लोक कोरोनाने बाधित आहेत.

याचा सर्वात मोठा फटका इटलीला बसला आहे. इटलीमध्ये आतापर्यंत ६००० पेक्षा जास्त जणांचा जीव गेला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post