मोदींना कोरोनाची भीती; बेल्जीयमचा दौरा रद्दवेब टीम : दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बेल्जियम दौरा कोरोनाच्या पृष्ठभूमीवर, स्थगित करण्यात आला आहे.

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी आज गुरुवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना ही माहिती दिली.

यावेळी बोलताना रवीश कुमार म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारत-युरोपियन संघाच्या शिखर बैठकीत सहभागी होणार होते.

मात्र उभय देशांच्या आरोग्य विभागांच्या अधिकाऱ्यांनी सध्याच्या परिस्थितीत दौरा टाळावा, असा सल्ला दिला आहे.

त्यामुळे सदर दौरा स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या दौऱ्याच्या नव्या वेळापत्रकावर पुढे खात्रीने विचार केला जाईल.

दरम्यान, जगभरात कोरोनाने थैमान घातले असून, भारतातही ३० जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

कोरोना रोखण्यासाठी केंद्र सरकारने राज्य आणि जिल्हा पातळीवर उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post