वेब टीम : मुंबई कोरोना विषाणू विरुद्ध लढ्यासाठी भारताचा दिग्गज क्रिकेटपटू भारतरत्न मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने ५० लाख रुपये दिले आह...
वेब टीम : मुंबई
कोरोना विषाणू विरुद्ध लढ्यासाठी भारताचा दिग्गज क्रिकेटपटू भारतरत्न मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने ५० लाख रुपये दिले आहेत.
केंद्र आणि राज्य सरकारे युद्ध पातळीवर प्रयत्न करत आहेत.
त्यांना मदत करण्यासाठी क्रीडा क्षेत्रातील विविध खेळाडू पुढे येत आहेत.
सचिन तेंडुलकरने कोरोनाविरुद्धच्या लढ्यात ५० लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे.
कोरोनाविरुद्धच्या लढ्यात आतापर्यंत कोणत्याही भारतीय खेळाडूने दिलेली ही सर्वात मोठी रक्कम आहे.
पीटीआय वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार,’सचिन तेंडुलकरने पंतप्रधान मदत निधीला आणि मुख्यमंत्री मदत निधीला प्रत्येकी २५ लाख रुपये देण्याचा ठरवले आहे.
हा निधी कोरोना विषाणूविरुद्ध वैद्यकीय सोयी सुविधांसाठी वापरला जाणार आहे.
कोरोना विरुद्धच्या लढ्यात सचिनला राज्य आणि केंद्र दोघांना मदत करायची होती म्हणून त्याने हा निर्णय घेतला.
COMMENTS