वेब टीम : दिल्ली व्हॉट्सअपचे नवीन फीचर प्रामुख्याने अफवा पसरवण्यासाठी सर्वात कुप्रसिद्ध फॉरवर्डेड मेसेजेसला लक्ष्य करण्यात आले आहे. त...
वेब टीम : दिल्ली
व्हॉट्सअपचे नवीन फीचर प्रामुख्याने अफवा पसरवण्यासाठी सर्वात कुप्रसिद्ध फॉरवर्डेड मेसेजेसला लक्ष्य करण्यात आले आहे.
त्यामुळे, आता फॉरवर्डेड मेसेज किंवा व्हायरल झालेले मेसेज एक व्यक्ती केवळ एकाच व्यक्तीला किंवा ग्रुपला चॅट करू शकेल.
सोबतच, जास्त फॉरवर्ड केल्या जाणारे मेसेज सध्या विशेष खूण करून चिन्हित केले जातील.
उल्लेखनीय बाब म्हणजे यापूर्वी व्हॉट्सअपवर फॉरवर्डेड मेसेज एकाचवेळी ५ जणांना शेअर करता येईल अशी सुविधा होती.
आता ही सुविधा काढण्यात आली आहे.
व्हॉट्सअपवरून पसरवल्या जाणाऱ्या मेसेजचा महापूर फॉरवर्डेड मेसेज रोखण्यासाठी आता कंपनीने नवीन फीचर आणले आहे.
कोरोना विरोधात वाढत्या अफवा, खोट्या बातम्या आणि द्वेष रोखण्यासाठी व्हॉट्सअपने फॉरवर्डेड मेसेजेसवर नियंत्रण ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
यानुसार, एखादे मेसेज खूप फॉरवर्ड होऊन तुमच्याकडे आल्यास तुम्ही ते केवळ एकाच चॅटला फॉरवर्ड करू शकाल.
आता एकापेक्षा जास्त चॅट निवडून ते अनेकांना फॉरवर्ड करता येणार नाहीत.
५ लोकांना फॉरवर्ड करणे ही सुद्धा एक मर्यादाच होती.
केवळ ५ लोकांना मेसेज फॉरवर्ड करण्याचा निर्णय घेतला तेव्हा व्हायरल मेसेज फॉरवर्ड करण्याचे प्रमाण २५ टक्के घटले असा कंपनीचा दावा आहे.
आता ही मर्यादा केवळ एका चॅटपुरती करण्यात आल्याने निश्चितच विनाकारण चुकीचे आणि सत्यता न तपासता मेसेज पुढे ढकलण्याचे प्रमाण कमी होईल, असे सांगितले जात आहे.
COMMENTS