वेब टीम : अहमदनगर लॉकडाउनच्या काळात केंद्र व राज्य सरकारने विविध दुकाने सुरु करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांन...
वेब टीम : अहमदनगर
लॉकडाउनच्या काळात केंद्र व राज्य सरकारने विविध दुकाने सुरु करण्यास परवानगी दिली आहे.
त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांना त्यांची दुकाने सुरु करण्यास परवानगी मिळाल्याचा मेसेज फॉरवर्ड होत आहे.
असे असले तरी जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः आदेश काढल्याशिवाय मात्र कुणालाही दुकाने सुरु करता येणार नाही.
केंद्र आणि राज्य शासनाने लॉकडाउन कालावधीत सुरू करण्याच्या विविध बाबीसंदर्भात सूचना दिल्या असल्या तरी जिल्हा प्रशासनाचे यासंदर्भात स्वतंत्र आदेश आल्याशिवाय कोणीही त्यांच्या आस्थापना/ दुकाने सुरू करू नयेत, असे जिल्हा प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले आहेत.
COMMENTS