विद्यार्थ्यांसाठी खुशखबर; 'या' विद्यार्थ्यांची होणार परीक्षा, केंद्र सरकारची परवानगी


वेब टीम : दिल्ली
कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर देशातील शैक्षणिक क्षेत्राचे वेळापत्रकच कोलमडले.

राज्यांच्या मागणीनंतर केंद्राने दहावी-बारावीच्या परीक्षा घेण्यासाठी परवानगी दिली.

याविषयी केंद्राने नियमावलीही जाहीर केली. या संदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी माहिती दिली.

सीबीएसई बोर्ड आणि विविध राज्यांनी दहावी बारावीच्या परीक्षां संदर्भात केंद्राकडे विनंती केली होती.

केंद्र सरकारने चौथ्या लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर राज्यांकडून होणाऱ्या मागणीला परवानगी दिली.

राज्य शैक्षणिक मंडळ, सीबीएसई, आयसीएसई आदी मंडळांना परीक्षा घेण्यासाठी सशर्त परवानगी देण्यात आली.

केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांनी संदर्भातील पत्र राज्यांच्या सचिवांना पाठवले आहे.

“देशातील लाखो विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भविष्य लक्षात घेऊन लॉकडाऊनच्या काळात परीक्षा घेण्यासाठी परवानगी दिली.

राज्यांना आणि इतर बोर्डांना दहावी बारावीच्या परीक्षा घेता येणार असून, सोशल डिस्टसिंगसह काही बाबींचे पालन करण्याचे निर्देश दिले आहेत,” असे शाह म्हणाले.

कंटेनमेंट झोनमध्ये परीक्षा केंद्र ठेवण्यास केंद्राने स्पष्ट नकार दिला. त्याचबरोबर शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी मास्क घालणे अनिवार्य आहे.

त्याचबरोबर विद्यार्थ्यांची थर्मल चाचणी करावी. परीक्षा केंद्रावर सोशल डिस्टसिंगचे पालन केले जावे.

विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहोचवण्यासाठी विशेष वाहतूक व्यवस्था करण्यात यावी, असे निर्देश केंद्राने राज्यांना दिले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post