संजय राऊत- रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्यात ट्विटरवॉर...


वेब टीम : मुंबई
परप्रांतीय मजुरांना त्यांच्या राज्यात परत पाठवण्याच्या मुद्द्यावरून सध्या ‘ठाकरे’ सरकार आणि रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्यात चांगलाच वाद रंगला आहे.

महाराष्ट्र सरकार आणि रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्यामध्ये रंगलेलं ट्विटर युद्ध चांगलंच पेटलं असतानाच आता यात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी उडी घेतली आहे.

“महाराष्ट्रातील १२५ रेल्वेगाड्यांची यादी कुठे आहे? मध्यरात्री २ वाजेपर्यंत मला फक्त ४६ गाड्यांची यादी मिळाली असून त्यापैकी ५ पश्चिम बंगाल किंवा ओडिशाकडे जाणाऱ्या आहेत.

परंतु चक्रीवादळ अम्फानमुळे त्या तूर्तास धावू शकत नाहीत.” असा दावा रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी २ वाजून ११ मिनिटांनी ट्विटरवर केला.

“ १२५ रेल्वेगाड्यांच्या तयारीत असूनही आम्ही आज केवळ ४१ गाड्या सोडत आहोत. ” अशी पुष्टी त्यांनी जोडली. त्यांच्या या ट्विटनंतर संजय राऊत यांनी थेट रेल्वेमंत्र्यांचाच समाचार घेतला आहे.

‘ पीयूषजी , १४ मे २०ला सुटलेल्या नागपूर – उधमपूर ट्रेनसाठी कोठली यादी घेतली होती? आधी ट्रेन नंतर माणसे जमा करण्यासाठी काय कष्ट घेतले, कृपया जाहीर कराल?

आता यादी कसली मागताय? राज्यसभेत आपण महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताय हे विसरू नका.’ असे म्हणत राऊत यांनी त्यांचा समाचार घेतला.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post