कोकणालाही टोळधाडीचा धोका...? वाचा काय आहे सत्य...


वेब टीम : मुंबई
राज्यात विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये टोळधाडीने शिरकाव केला आहे.

लाखो हेक्टर शेतीला याचा फटका बसत आहे. दुसरीकडे ही टोळधाड मुंबईसह कोकणात धडकणार असल्याच्या अफवा सोशल मीडियातून पसरत आहे.

आधीच देशात सर्वाधिक ‘कोरोना’ रुग्णांची संख्या मुंबईत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

त्यात आता हे नवीन संकट काय आहे, म्हणून नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे.

मात्र, मुंबईच्या नावाने व्हायरल होणाऱ्या व्हिडीओ नंतर महापालिकेने स्पष्टीकरण दिले आहे.

हे व्हिडीओ आणि मॅसेज मुंबईचे नसल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.

मुंबईला टोळधाडीचा कोणताही धोका नसल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

मुंबई महापालिकेच्या आपातकालीन विभागाने ही माहिती दिली आहे.

तसेच खोटे मेसेज फॉरव्हर्ड करणाऱ्यांविरोधात कारवाई करणार असल्याने प्रशासनाने सांगितले आहे.

मात्र केंद्रीय कृषी मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या टोळधाडी संदर्भात माहिती देणाऱ्या द लोकस्ट वॉर्निंग ऑर्गनायझेशनने (एलडब्लूओ) मुंबईला टोळधाडीचा धोका नसल्याचे म्हटले आहे.

तर दुसरीकडे राज्याचे कृषी आय़ुक्त सुहास दिवस यांनी मुंबईकरांसाठी टोळधाडीसंदर्भात कोणताही इशारा देण्यात आलेला नसल्याचे स्पष्ट केले आहे.

ऐन खरीपाच्या तोंडावर आधीच ‘कोरोना’ची चिंता त्यात या टोळधाडीला सामोरे  जाण्याचे आव्हान राज्य आणि केंद्र सरकार समोर आहे.

अन्न आणि शेती कृषी संघटना या टोळधाडीबाबत महत्वाची माहिती गोळा करत असते. तसेच सर्व देशांना सावध करत असते.

टोळधाडीबाबत सहा आठवडे आधीच संबंधित देशांना इशारा दिला जातो.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post