अहमदनगर : जिल्ह्यात पावसाची दमदार हजेरी, पिकांचे नुकसान


वेब टीम : अहमदनगर
जिल्ह्यात विविध ठिकाणी रविवारी (दि.31) रात्रभर पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.  पावसाचे रोहिणी नक्षत्र सुरु होवून आठ दिवस उलटल्याने पावसाची शक्यता नसल्याचे चित्र होते. मात्र, रविवारी अचानक जोरदार वारा आणि पावसाने हजेरी लावली. सोमवारी (दि.1) पहाटे पर्यंत कमी अधिक प्रमाणात हा पाऊस बरसत होता. रात्रभरात तब्बल 388.6 मिमी. पाऊस बरसला आहे. विजांच्या कडकडाटासह झालेल्या वादळी पावसाने जिल्ह्यात काही ठिकाणी फळबागा व इतर उन्हाळी पिकांचे नुकसान झाले. तर बहुतांशी ठिकाणी रात्रभर वीजपुरवठा खंडित झाला असल्याचे समजते. रविवारच्या जोरदार पावसाने हवामानात बदल झाला असुन पारा घसरुन थंडावा निर्माण झाला आहे.

जिल्ह्यात रविवार - सोमवार आणि मंगळवार असे 3 दिवस वादळी वार्‍यासह पाऊस होण्याचा अंदाज वेधशाळेने वर्तविला होता. तो तंतोतंत खरा ठरला असून रविवारी (दि.31) रात्रभर अकोले संगमनेर व राहता हे 3 तालुके वगळता सर्वदूर जोरदार पाऊस झाला. श्रीरामपूर मध्ये रात्रभरात तब्बल 71 मिलीमीटर पाऊस बरसला आहे.

कोपरगाव - 4 मिमी., 
राहुरी - 42.6 मिमी., 
नेवासा - 31 मिमी., 
नगर- 21 मिमी., 
शेवगाव - 31मिमी., 
पाथर्डी - 29 मिमी., 
पारनेर- 58 मिमी., 
कर्जत - 55 मिमी., 
श्रीगोंदा - 31 मिमी., 
जामखेड -15 मिमी. 
अकोले - 0 मिमि.
संगमनेर - 0 मिमि.
असा जिल्हाभरात एकूण 388.6 मिमी. पावसाची नोंद झाली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post