..अन्यथा गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल... जितेंद्र आव्हाडांकडून पडळकरांचा समाचार


वेब टीम : मुंबई
‘शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहे’, असे म्हणत भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी पवारांवर टीका केली आहे.

याच पार्श्वभूमीवर या वक्तव्याचा राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी निषेध करत ‘गंभीर परिणामांना सामोरं जावं लागेल’, असा इशाराही पडळकरांना दिला आहे.

आव्हाड म्हणाले की, “शरद पवारांच्या पायाच्या धुळीची लायकी नसलेल्या माणसाने त्यांच्यावर टीका करावी हे हसण्यासारखं आहे.

केवळ प्रसिद्धीच्या वर्तुळात राहण्याचा हा असहाय्य प्रयत्न आहे. शरद पवारांबद्दल बोलण्याची लायकी आहे का त्यांची.

जो माणूस कालपर्यंत मोदींना शिव्या देत होता, त्यांच्याकडूनच उमेदवारी घेतो.

भाजपात जाऊन बहुजनांच्या गोष्टी आम्हाला शिकवताय.

कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या माझ्यासारख्या माणसाला शरद पवारांनी इथपर्यंत आणलं आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post