मोदीजी शूर आणि योद्धे... त्यांच्या नेतृत्वात भारत चीनचा बदला घेईल : राऊत


वेब टीम : मुंबई
‘चीनच्या आगळीकीला चोख प्रत्युत्तर कधी मिळेल?

गोळीही न झाडता आपले 20 जवान शहीद होतात, आपण काय केले?

चीनचे किती जवान मारले गेले? चीनने आपल्या भूमीत घुसखोरी केली आहे का?

पंतप्रधानजी, या संघर्षाच्या काळात देश तुमच्या पाठीशी आहे, मात्र सत्य काय आहे?

बोला, काहीतरी बोला. देशाला सत्य जाणून घ्यायचं आहे. जय हिंद!’ अशा आशयाचे ट्वीट संजय राऊत यांनी केले आहे.

भारत चीन सीमेवरील संघर्षाचे रुपांतर आता हिंसक झटापटीत झाले हे.

ही ढटापट एवढी तीव्र होती की, त्यात भारताच्या 20 जवानांनी प्राण गमावलेत.

या वृत्तानंतर देशभरातील विरोधी नेते पंतप्रधान मोदींवर निशाणा साधत त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती करत आहेत.

त्यातच आता महाराष्ट्रातील शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनीही पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे.

तसेच, देश आपल्या सोबत आहे. आपण शूर आणि योद्धे आहात.

आपल्या नेतृत्वात भारत चीनचा बदला घेईल.’ असा विश्वासही संजय राऊत त्यांनी व्यक्त केला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post