अमेरिका आक्रमक; चीनला शह देण्यासाठी तीन युद्धनौका तैनात


वेब टीम : वॉशिंग्टन
कोरोना संकटावरून ताणलेले अमेरिका व चीनमधील संबंध येत्या काळात आणखी विकोपाला जाण्याची चिन्ह दिसून येत आहेत.

कारण अमेरिकने जवळपास तीन वर्षात प्रथमच हिंदी-प्रशांत महासागरात तीन विमानवाहू युद्धनौकांना उतरवले आहे.

चीनला इशारा देण्याच्या दृष्टिकोनातून युद्धनौकांना गस्तीवर पाठविण्यात आल्याचे सांगितले जात आहे.


त्यामुळे दोन्ही देशातील तणाव वाढण्याची शक्‍यता व्यक्‍त केली जात आहे.

हिंदी-प्रशांत महासागर परिसरात अमेरिकेकडून नौदलाचा फौजफाटा उतरविण्यात आला आहे.

यामध्ये नोदल क्रुझर, विध्वंसक, लढाऊ जेट आणि इतर विमानांसह तीन शक्तिशाली युद्धनौकांचा समावेश आहे.

यूएसएस थियोडोर रुझवेल्ट, यूएसएस निमित्झ आणि यूएसएस रोनाल्ड रेगन या तीन युद्धनौका गुरुवारपासून या क्षेत्रात गस्त घालत आहेत.

कोरोना संकटावरून अमेरिकेची चीनविरोधात जोरदार  टीका सुरू असताना या परिसरातील अमेरिकन नोदलाची उपस्थिती हे चीनसाठी एक प्रकाराचा इशारा मानला जात आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post