विश्वासघातकी चीनचा कावा उघड... कोरोनाचे पुरावे केले नष्ट...


वेब टीम : बीजिंग
चीनमधील आणखी एका डॉक्टराने कोरोनाबाबत पर्दाफाश केला आहे. 

चीनमधील वुहान शहरात कोरोनाचा पहिल्यांदा फैलाव सुरू झाल्याची माहिती स्थानिक अधिकार्‍यांनी लपवली. 

याबाबतचे पुरावेही नष्ट करण्यात आल्याचा दावा प्रोफेसर क्वोक युंग यूएन यांनी केला आहे. 

क्वोक युंग यूएन हे प्रसिद्ध शल्यचिकित्सक आहेत. डिसेंबर 2019 च्या अखेरीस वुहानमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून आले होते. 

वुहानमधील कोरोनाचे परीक्षण करणारे डॉक्टर क्वोक यंग म्हणाले की, सुरुवातीच्या काळात कोरोनाबाबतची तपासणी धीम्यागतीने सुरू होती. 

ज्यावेळी आम्ही वुहानमधील बाजारपेठेत तपासणीसाठी गेलो तेव्हा तिथे आम्हाला काहीच दिसले नाही. 

तेथील पुरावे आधीच नष्ट करण्यात आले होते, असा आरोपही क्वोक युंग यांनी केला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post