वेब टीम : मुंबई कोरोनाचे संकट अजूनही कायम असल्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) सर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य सरकारने ...
वेब टीम : मुंबई
कोरोनाचे संकट अजूनही कायम असल्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) सर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
परीक्षांचे नवे सुधारित वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.
राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार यांनी राज्य मंत्रिमंडळ बैठकीनंतर ही माहिती दिली.
जेईई आणि ‘नीट’ परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी होत आहे.
मात्र, केंद्र सरकार या परीक्षा घेण्यावर ठाम आहे.
एमपीएससीची पूर्व परीक्षा २० सप्टेंबर रोजी होणार होती.
त्याचे जिल्हा स्तरावरील केंद्र बदलून देण्यात यावे, यासाठी विदयार्थी न्यायालयातही गेले आहेत.
COMMENTS