हॉटेलमध्ये ग्राहकांच्या ऑर्डर स्वीकारतोय रोबोट... कोरोनामुळे नवी शक्कल


वेब टीम : दिल्ली
सध्याच्या कोरोना काळात सोशल डिस्टन्सिंग अनिवार्य झाले आहे. जगभरातील अनेक रेस्टॉरंटस् त्यासाठी वेगवेगळे उपाय करीत आहेत. 

दक्षिण कोरियातील देजॉन शहरातील एका रेस्टॉरंटमध्ये त्यासाठी ‘रोबो बरिस्ता’ची ड्यूटी लावण्यात आली आहे. 

चहा-कॉफी तयार करण्यापासून ते ग्राहकांना देण्यापर्यंतची सर्व कामे हा रोबोच करतो! हा रोबो स्वतः ग्राहकांबरोबर सोशल डिस्टन्सिंगचे पालन करतो. 

त्यांच्या टेबलपर्यंत तो चहा, कॉफी व अन्य पदार्थ नेतो. या रेस्टॉरंटमध्ये सर्व काही ‘ऑटोमॅटिक’ करण्यात आले आहे. येथे ग्राहक टचस्क्रीनवर आपला ऑर्डर देतात आणि त्याबरोबरच सर्व्हिस सुरू होते. 

काऊंटरवरील रोबो ऑर्डर तयार करून या रोबो बरिस्तावर ठेवतो आणि तो ग्राहकांना नेऊन देतो. टचस्क्रीनच्या वापरानंतरही संक्रमणाचा धोका होणार नाही अशी काळजी घेण्यात आली आहे. 

त्यामुळे इथे संक्रमणाच्या भयाशिवाय आरामात चहाकॉफी पिता येते असे ग्राहकांचे म्हणणे आहे. हा रोबो बरिस्ता रेस्टॉरंटमध्ये येणार्या ग्राहकांशी बातचितही करू शकतो. 

त्याच्यामध्ये असे सेन्सर आहेत जे सेल्फ-ड्रायव्हिंग म्हणजेच विनाचालक मोटारींमध्ये असतात. हा रोबो बरिस्ता साठप्रकारची कॉफी ग्राहकांना देऊ शकतो. 

दक्षिण कोरियात लॉकडाऊन शिथिल करण्यात आला असून रेस्टॉरंट, जीम, शाळा आणि दुकाने खुली करण्यात आली आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post