वेब टीम : मुंबई अयोध्येत आज भक्तिमय वातावरणात राम मंदिर भूमिपूजन संपन्न झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विधिवत पूजन केले. राम मंदिर भूम...
वेब टीम : मुंबई
अयोध्येत आज भक्तिमय वातावरणात राम मंदिर भूमिपूजन संपन्न झाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विधिवत पूजन केले.
राम मंदिर भूमिपूजनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी आनंद व्यक्त केला आहे.
तसेच खंतही. बाबरी पाडणारे माझे शिवसैनिक असतील तर मला त्याचा अभिमान आहे, असे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे त्यावेळी म्हणाले होते.
त्यांच्या आठवणीत संजय राऊत यांनी घुमट काढण्यात शिवसैनिकांचा मोठा वाटा असल्याचे सांगताना कुणीही याचं श्रेय घेऊ नये असं म्हटलं.
राम मंदिर भूमिपूजनाच्या कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेदेखील अयोध्येला जाणार आणि शिवसेना तेथे थाटामाटात कार्यक्रम घेणार असल्याचे संजय राऊत यांनी माध्यमांना सांगितले.
संजय राऊत म्हणाले, “राम मंदिराचं भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहे ही आनंदाची गोष्ट आहे.
हा शासकीय कार्यक्रम आहे. बाळासाहेबांना आणि शिवसेनेला कोणी विसरू शकत नाही. राम मंदिर उभारणीतील त्यांचे योगदान मोठे आहे.
आजच्या कार्यक्रमाचं श्रेय कोणीही घेऊ नये. या कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अयोध्येत जाणार आहेत.
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर शिवसेनेच्यावतीने तिथे थाटामाटात कार्यक्रम करणार आहोत, असे संजय राऊत यांनी सांगितले.
COMMENTS