आजपासून जिल्हाबंदी शिथिल, ई पासमधुन मुक्ततावेब टीम : मुंबई

सहा महिन्यापासून राज्यात सुरु असलेली जिल्हा बंदी अखेर उठली आहे. 


राज्यात एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात प्रवासासाठी लागणारा ई पास अखेर राज्य सरकारने रद्द केला आहे. 


त्यामुळे राज्यात एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात प्रवासासाठी परवानगी लागणार नाही. 


राज्य सरकारने मिशन बिगेन अगेन अंतर्गत लॉकडाऊनमध्ये अनेक सवलती दिल्या आहेत, त्याची नियमावली आज जाहीर झाली आहे. 


आंतरजिल्हा प्रवासाबाबत परिवहन विभाग नियमावली जारी करेेेल. 


  सरकारच्या नव्या गाईडलाईननुसार, हॉटेल आणि लॉज सुरू होणार आहेत. 


मात्र मेट्रो, सिनेमा गृह बंदच राहणार आहेत. तर मुंबई आणि MMR मध्ये शासकीय कार्यालय 30 टक्के क्षमतेने सुरु राहणार आहेत, 


तर उर्वरित महाराष्ट्रात शासकीय कार्यालयात 50 टक्के कर्मचारी उपस्थित राहतील.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post