शिवसैनिकांनी केली मारहाण.. माजी नौदल अधिकारी म्हणतात.. राज्य सरकार बरखास्त करा...वेब टीम : मुंबई

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबद्दलचे व्यंगचित्र ‘शेअर’ केल्याबद्दल शिवसैनिकांनी नौदलाचे माजी अधिकारी शर्मा यांना मारहाण केली होती. 


मदन शर्मा यांनी आज राज्यपालांची भेट घेतली. 


भेटीनंतर प्रसार माध्यमांशी बोलताना शर्मा म्हणाले – राज्य सरकार बरखास्त करुन राष्ट्रपती राजवट लागू करा, अशी मागणी मी केली आहे.


भाजपाचे आमदार अतुल भातखळकर हे देखील शर्मा यांच्या सोबत होते. 


या गुंडगिरीसाठी महाराष्ट्र सरकारने माफी मागितली पाहिजे. 


मारहाण करणाऱ्या शिवसैनिकांवर कठोर कलम लावा, अशी मागणी केली आहे. 


राज्यपालांनी यावर योग्य ती कारवाई करू असे आश्वासन दिले आहे, असे ते म्हणाले.


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेने महाराष्ट्राची माफी मागावी. 


या मारहाणीचे समर्थन करणारे अनिल परब यांना मंत्रिमंडळात राहण्याचा अधिकार नाही, अशी टीकाही भातखळकरांनी केली.


मारहाण करताना शिवसैनिक मला आरएसएस आणि भाजपाचा चमचा म्हणत होते. 


मी माजी नौदल अधिकारी आहे. माझा असून कोणत्याही पक्षाशी संबंध नाही. 


माझ्याबद्दल त्यांच्या मनात कोणी गैरसमज पसरवला आहे हे माहीत नाही, असे शर्मा म्हणाले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post