चंद्रकांत पाटलांना निवडणूक आयोगाने जबाबदारी दिली असेल तर उत्तमच...वेब टीम : मुंबई

महाराष्ट्रात सध्या मध्यावधी निवडणुकांसारखी परिस्थिती आहे असं वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं. 


यावर चंद्रकांत पाटील यांच्या भूमिकेकडे मी सकारात्मक पद्धतीने पाहतो. 


निवडणुकीबाबत बोलण्याची जबाबदारी निवडणूक आयोगाची असते. 


त्यांना पाटील यांना ती जबाबदारी मिळाली असेल तर उत्तम आहे, अशा शब्दात शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाष्य केलं. 


तसंच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखालील सरकार पाच वर्ष टिकणार, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.


शिवसेना खासदार संजय राऊत आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीवरुन राजकारण तापलं आहे. 


या भेटीविषयी संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'सामना'तील मुलाखत घेण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. 


मात्र यावेळी बिहार निवडणुकीबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही, असं संजय राऊत यांनी सांगितलं. 


तसंत फडणवीस यांची मुलाखत अन एडिटेडच असेल, असंही राऊत यांनी स्पष्ट केलं. 


दरम्यान फडणवीस यांच्यासोबतच्या मुलाखतीची तारीख अद्याप निश्चित झालेली नाही. 


ती ठरवण्यासाठी आम्ही पुन्हा एकदा भेटू, असंही संजय राऊत नमूद केलं.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post